top of page

अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा रद्द; कोल्हापूरऐवजी सांगलीला झाले रवाना...


ree

सांगली- राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने पूर आला आणि लोकांचं जीवन विस्कळीत झालं. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही महापुराचा तडाखा बसला. राज्यात लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं असून, पुरग्रस्त पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज (२६ जुलै) दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री कोल्हापूर-सातारा जिल्ह्यातील भागांची पाहणी करणार होते. मात्र, अजित पवारांच्या दौऱ्यात काहीसा बदल झाला आहे. अजित पवार कोल्हापूरऐवजी सांगलीला रवाना झाले आहेत. सातारा जिल्ह्यात दोन गावांमध्ये दरड कोसळून मोठी जीवित हानी झाली आहे. दोन्ही गावांमध्ये मदत व बचावकार्य सध्या चालू सुरू आहे. अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात भूस्खलन झाले असून, आंबेघर आणि मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना घडल्या होत्या. या भागांना मुख्यमंत्री आज भेट देणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. सकाळी १०.४५ वाजता पुण्याहून कोयनानगरकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार आहेत. सातारा जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनाग्रस्त भागांची मुख्यमंत्री हवाई पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता कोयनानगर हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल. सकाळी ११.४० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधणार आहेत. या भेटीनंतर मुख्यमंत्री दुपारी १२.१५ वाजता कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही होणार आहे. दुपारी १.२५ वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे रवाना होतील.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा -

सकाळी 10.45 वा. पुणे विमानतळ येथून हेलिकॉप्टरने कोयनानगर, ता पाटण, जि.साताराकडे प्रयाण व हवाई पाहणी.

सकाळी11.30 वा कोयनानगर हेलिपॅड ता. पाटण येथे आगमन. सकाळी 11.35 वा मोटारीने जिल्हा परिषद शाळा, कोयनानगर ता. पाटण कडे प्रयाण.

सकाळी 11.40 वा जिल्हा परिषद शाळा, कोयनानगर ता. पाटण येथे आगमन. सकाळी 11.40 वा. कोयनानगर परिसरातील महापुरातील बाधित लोकांच्या छावणीस भेट व मदत वाटप.

दुपारी 12.10 वा. मोटारीने कोयनानगर विश्रामगृहकडे प्रयाण

दुपारी 12.15 वा. कोयनानगर विश्रामगृह येथे आगमन.

दुपारी 12.15 वा. सातारा जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठका व पत्रकार परिषद.

दुपारी 1.15 वा. मोटारीने कोयनानगर हेलिपॅडकडे प्रयाण.

दुपारी 1.20 वा. कोयनानगर हेलिपॅड येथे आगमन दुपारी 1.25 वा. हेलिकॉप्टरने पुणे विमानतळकडे प्रयाण.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर-सातारा दौरा कसा होता.

सकाळी ९ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन

सकाळी ९.१५ वाजता पूरग्रस्त परिसर पाहणी करणार. यात शाहू सांस्कृतिक हॉल येथे पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट आणि शिवाजी पूल पूरग्रस्त परिसर पाहणी

सकाळी १०.१५ वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीची आढावा बैठक घेणार. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात ही बैठक होणार आहे.

सकाळी ११.३० वाजता हेलिकॉप्टरने शिरोळकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार शिरोळ परिसर पूरग्रस्त पाहणी करणार.

दुपारी १.१५ वाजता हेलिकॉप्टरने पलूसकडे रवाना होणार. दुपारी २.१५ वाजता पलूस परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार.

दुपारी ३.४५ वाजता सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार. बैठकीनंतर सायंकाळी ५.१५ वाजता हेलिकॉप्टरने साताऱ्याच्या दिशेनं रवाना होणार. सायंकाळी ६ वाजता

सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीची आढावा बैठक घेणार.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज सांगली

ree

Mahalive News



Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page