लातूर जिल्ह्यात डेल्टा प्लस करोना विषाणूमुळे पुन्हा निर्बंध लागू; जाणून घ्या नवीन मार्गदर्शक सूचना..
- MahaLive News
- Jun 26, 2021
- 2 min read

लातूर- महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळेही राज्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.त्यामुळे सरकारडून जिल्ह्यात आता तिसऱ्या स्तरावरील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सरकारने जारी केलेल्या नव्या आदेशात म्हटले आहे की, आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती बघता तिसऱ्या स्तरावरील निर्बंध महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत. तिसऱ्या स्तरावरील निर्बंध आणखी कडक करायचे असल्यास स्थानिक प्रशासन त्याबाबत निर्णय घेऊ शकते. लेव्हल ३ मध्ये अत्यावश्यक दुकाने आणि आस्थापना सर्व दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे. तर अत्यावश्यक नसलेली दुकाने आणि आस्थापने सोमवार ते शुक्रवार या दिवसांत ४ वाजेपर्यंत खुली ठेवू शकता. वीकेंड कडक निर्बंध लागू असतील.
काय सुरू काय राहणार बंद ?
● जीवनावश्यक, अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने आठवड्याचे सर्व दिवस दु. ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.
● अत्यावश्यक नसलेली इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दु. ४ वाजेपर्यंत सुरु राहतील व शनिवार-रविवार बंद राहतील.
● मॉल्स, सुपर शॉप्स, चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, ई. बंद राहतील.
● रेस्टोरंटस, हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार ५०% क्षमतेत दु. ४ वाजेपर्यंत सुरु राहतील व दु. ४ नंतर होम डिलिव्हरी सुरू राहील व शनिवार होमी डिलिव्हरी सुरू राहील.
● सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, मॉर्निंग वॊक, सायकलिंग सोमवार ते रविवार पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंत.
● खाजगी अस्थापना, कार्यालय सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत व शनिवार-रविवार बंद राहतील.
● क्रीडा प्रकार सोमवार ते रविवार पहाटे ५ ते ९ व सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत (फक्त मैदानी क्रीडा प्रकार).
● लग्न समारंभ फक्त ५० व्यक्तिंच्या मर्यादित होणार.
● अंत्यविधी फक्त २० व्यक्तिंच्या मर्यादेत होणार.
● बांधकाम विषयक बाबी- बांधकाम साइटवर राहणारे कामगारासह, दुपारी ४ वाजेपर्यंत इतरत्र राहणाऱ्या कामगारांना काम करण्याची परवानगी.
● कृषी व अनुषंगिक सेवा, कामे सोमवार ते रविवार दुपारी ४ वाजेपर्यंत.
● ई-कॉमर्स-वस्तू व सेवा - नियमित सुरू राहतील.
● जमावबंदी- सकाळी ८ पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व संचारबंदी रात्री ९ पासून पहाटे ५ वाजेपर्यंत.
● व्यायामशाळा, जिम, केशकर्तनाल, ब्युटी पार्लर, वेलनेस सेंटर्स- 50 टक्के, दुपारी ४ वाजेपर्यंत.
● सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस) 100% क्षमतेत उभे राहून प्रवास करण्यास मनाई.
कोविड सुरक्षा नियमांचे पालन अधिक सक्तीने करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. (फेसमास्क वापर, शारीरिक अंतर, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, ई.)
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Comments