केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाविकासआघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; जयंत पाटील...
- MahaLive News
- Jun 26, 2021
- 1 min read

लातूर- केंद्रीय यंत्रणांचा वापर करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आघाडी सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. ते लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. राज्यामध्ये मागच्या काळात अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल नोंदवले गेले होते. त्यांनी गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. त्या आरोपपत्राचा वापर करून किंवा बाहेरुन आरोप करुन अनिल देशमुखांना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्रीय एजन्सीकडून सुरू झाला असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. अनिल देशमुख यांच्यावर यापूर्वी सीबीआयने धाडी टाकल्या होत्या त्यात त्यांना काही सापडलं नाही. म्हणून आठ-दहा वर्षापूर्वीचं जुन्या गोष्टी उकरून काढून त्या त्रुटींवर बोट ठेवून अनिल देशमुख यांना पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न ईडीमार्फत होत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. राज्यभरातील ओबीसी नेतृत्त्व ठरवून मोडीत काढणारा भाजप आज ओबीसी आरक्षणसाठी आंदोलन करत आहे. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली, अशा शब्दात जयंत पाटील यांनी महाराष्ट्र भाजपवर टीका केली. जयंत पाटील यांनी यानिमित्तानं विधानसभा निवडणुकीत भाजपनं ओबीसी नेत्यांना नाकरण्यात आलेल्या तिकिटांच्या प्रकरणाकडे लक्ष वेधलं आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाजपनं तिकीट कापलं होतं, त्याकडे लक्ष वेधलं आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Comments