देशातील पहिल्या मोफत ऑटिझम सेंटरचे लातूरमध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण...
- MahaLive News
- Jun 26, 2021
- 1 min read

लातूर- जिल्ह्यात देशातील पहिल्या ऑटिझम सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग व सिद्धिविनायक प्रतिष्ठान, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे सेंटर उभारण्यात आले आहे. दरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते याचे उदघाटन करण्यात आले आहे. योग्य निदान व उपचार करून अशा बालकांचे पुनर्वसन मोफत करणारे हे देशातील पहिले सेंटर असून, हे सेंटर अत्याधुनिक सोयी- सुविधांनी युक्त आहे. याबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या संकटामुळे लहान मुलांची शाळा बंद असून स्वमग्नता तसेच मोबाईलच्या अतिरेकामुळे अनेकजण मानसिक आजारांना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविला जावा. या आस्थापनेमध्ये ऑटिझम अर्थात स्वमग्नता, बहुविकलांगता, सेलेवर पल्स, बुध्यांक मापन, अति चंचलपणा, या सारख्या दिव्यांगत्वावर उपचार करण्यासाठी तसेच अस्थिव्यंग असलेल्या बालकांना थेरपी देण्यासाठी सर्व अद्ययावत उपकरणे व तज्ञ व्यक्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या आस्थापनेचे उद्घाटन होण्यापूर्वीच इथे वेगवेगळ्या आजारांची 500 मुले दाखल असून त्यातील काही मुले योग्य उपचार घेऊन पूर्ण बरे होऊन घरी देखील गेले असल्याची माहिती सीईओ अभिनव गोयल यांनी दिली.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Comments