भारतातील लोकशाहीसाठी लढत राहीन; काँग्रेस नेते राहुल गांधी...
- MahaLive News
- Mar 25, 2023
- 1 min read

लोकसभा सचिवालयाकडून खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. सभागृहातील गंभीर कृत्यांबाबत त्यांनी अनेकदा लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिल्याचं त्यांनी सांगितलं. संसदेत केलेलं माझं भाषण काढून टाकण्यात आलं आणि नंतर मी लोकसभा अध्यक्षांना सविस्तर उत्तर लिहिलं. काही मंत्र्यांनी माझ्याबद्दल खोटे बोलले की, मी परकीय शक्तींची मदत घेतली. पण, मी असं काही केलेलं नाही. मी प्रश्न विचारणं थांबवणार नाही, मी पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांवर प्रश्न करत राहीन. मी अदानींना एकच प्रश्न विचारला होता. मी प्रश्न विचारत राहीन आणि भारतातील लोकशाहीसाठी लढत राहीन, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय.
मी अनेकदा सांगितलं आहे की, लोकशाहीवर या देशात हल्ला होत आहे. प्रत्येक दिवशी आपण याचं उदाहरण पाहतो आहे. मी संसदेत पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांच्या नात्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पण माझा आवाज दाबण्यात आला. त्यामुळं मी विचारलेले प्रश्न आणि मुद्दे सभागृहातील कामकाजाच्या रेकॉर्डवर नाही, असंही यावेळी राहुल गांधी म्हणाले.
Comments