Search
राज्यात लवकरच होणार सात हजार पोलिस भरती...
- Venkat Rautrao
- Aug 25, 2022
- 1 min read

मुंबई- राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२४ ऑगस्ट) विधानसभेत दिली. विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीसांनी ही माहिती दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Comments