Search
54 आमदारांना नव्याने नोटीसा जारी...
- MahaLive News
- Sep 24, 2023
- 1 min read

आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीसाठी शिंदे आणि ठाकरे गटातील एकूण 54 आमदारांना नव्याने नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिकार्यांनी या नोटीसा बजावत यामध्ये सोमवारी 3 वाजता होणाऱ्या सुनावणीला त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. सुप्रीम कोटने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लवकरात लवकर सुनावणी घेण्यास सांगितले आहे. तसेच कार्यवाहीबद्दलची माहिती देण्यास सांगितले आहे.
Comments