Search
मराठवाड्यात होणार मंत्रिमंडळाची बैठक...
- MahaLive News
- Aug 24, 2023
- 1 min read

तब्बल 7 वर्षानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. विभागातील प्रलंबित प्रश्न आणि टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्भूमीवर ही बैठक होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 16 सप्टेंबर रोजी बैठक होण्याची शक्यता आहे. याबाबत शासनाकड्न तोंडी निरोप आला असून, आठवडा अखेरीस नियोजनाचे पत्र येणे अपेक्षित आहे. यापूर्वी मराठवाड्यात 7 वर्षापूर्वी 4 ऑक्टोबर 2016 रोजी मंत्रीमंडळाची बैठक पार पडली होती.
Comments