top of page

बीडमध्ये कोंबड्या उडवून नारायण राणेंच्या पुतळ्याचे दहन; शिवसैनिकांनी दिली पोलिसात तक्रार...


ree

बीड- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशिर्वाद यात्रेदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद बीडमध्ये उमटले. बीडमध्ये संतप्त शिवसैनिकांनी कोंबड्या उडवून राणेंच्या पुतळ्याचे दहन केले. प्रचंड घोषणाबाजी करत राणेंच्या नावाने बोंब मारून आंदोलन करण्यात आले. तर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नारायण राणेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अवमानकारक वक्तव्य वापरले. राणेंच्या या विधानामुळे शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याचे पडसाद बीडमध्येही उमटले आहे. बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी नगररोडवरील चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. नारायण राणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला. त्यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा, बेताल वक्तव्य करणाऱ्या राणेंना समुद्रात बुडवा अशा घोषणा देवून तिव्र शब्दात निषेध करण्यात आला. तर शिवाजीनगर पोलिसात नारायण राणेंच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. या आंदोलनात किसान आघाडीचे जिल्हासंघटक परमेश्वर सातपुते, उपजिल्हाप्रमुख आशिष मस्के, तालुकाप्रमुख गोरख सिंगण, शहरप्रमुख सुनिल सुरवसे, मशरू पठाण, रतन गुजर, कल्याण अवचट, सखाराम देवकर, देवराव घोडके, शिवाजी कोलंगडे, राजाभाऊ नवले, रणजित कदम, सुमंत रूईकर, नंदू येवले, अर्जुन नलावडे, शंकर चव्हाण, राजू लोंढे, रविकुमार कुलकर्णी, विक्की जाधव, सुदर्शन मोरे, हनुमान जाधव, पांडुरंग गवते, विकास गवते सह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज बीड

ree

Mahalive News


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page