top of page

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक; पोलिस राणेंना घेऊन नाशिकच्या दिशेनं रवाना


ree

संगमेश्वर- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेले कानाखाली वक्तव्य आता राणेंच्या अंगाशी आले आहे. भाजपने राणेंच्या वक्तव्याला समर्थन नसल्याचे सांगतानाच राणेंच्या पाठीशी उभा राहू असे स्पष्ट केले आहे. पण नारायण राणे यांच्या अटकेची प्रक्रिया ही रत्नागिरी पोलिसांकडून सुरू झाल्याची माहिती आहे. राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानेच रत्नागिरी पोलिसांकडून ही प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे. त्याचवेळी राणेंनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. पण हायकोर्टानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यासाठी नकार दिला आहे. नाशिकमधून दाखल झालेला पोलिसांच्या पथकाकडून ही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळेच रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई करत नारायण राणेंना अटक केली आहे. नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा संगमेश्वर येथे दाखल झाला आहे. संगमेश्वरच्या गोळवली येथे गेल्या एक ते दीड तासांपासून चर्चा सुरू आहे. पण या प्रकरणात नारायण राणे यांच्याकडून काही कायदेशीर गोष्टी पुर्ण करण्यासाठीचा खटाटोप पोलिसांकडून सुरू आहे. त्याचवेळी पोलिसांना आणि कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीचे प्रकारही याठिकाणी निदर्शनास आले आहेत. नाशिक तसेच औरंगाबाद, पुणे अशा विविध ठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेकडून नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. नारायण राणे यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिस अधिक्षकांकडे अटक वॉरंट नसल्याची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. त्याचवेळी पोलिसांवर खूपच दबाव असल्याचेही सांगण्यात आल्याची प्रसारमाध्यमांना कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. नारायण राणे यांच्या प्रकृतीचे कारण दाखवत ही अटक टाळता येते का ? यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत अशीही माहिती मिळत आहे.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज अमरावती

ree

Mahalive News


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page