नव्या वर्षात मोदींच्या हस्ते होणार रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्धाटन...
- MahaLive News
- Dec 24, 2022
- 2 min read

लातूर- फडणवीस मुख्यमंत्री असतांना मराठवाड्यातील लातूर येथे रेल्वे कोच तयार करणाऱ्या कारखान्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी जागा देखील राज्य सरकारने उपलब्ध करून दिली होती. कारखान्यासाठी आवश्यक मुलभूत सुविधा पुरवून देखील प्रत्यक्षात अजून ही कोच फॅक्टरी सुरू होऊ शकली नाही.
परंतु आता नव्या वर्षात मराठवाड्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार देणारी रेल्वे कोच फॅक्टरी प्रत्यक्षात सुरू होणार आहे. लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी नुकतीच दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली तेव्हा निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर जानेवारी अखेरीस या कोच फॅक्टरीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय रेल्वेमंत्री मा. ना. श्री. अश्विनी वैष्णवजी यांची आज दिल्ली येथे भेट घेतली. मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीची टेंडर प्रोसेस पूर्ण करून बोगी निर्मितीला सुरुवात करावी, औरंगाबाद-हैदराबाद रेल्वेला पानगाव येथे थांबा द्यावा, पुणे-अमरावती रेल्वेला पानगाव येथे थांबा द्यावा, बिदर-लातूर-मुंबई रेल्वेला मुरुड येथे थांबा द्यावा, लातूर रेल्वे स्टेशनवर पिटलाइनचे काम तत्काळ सुरुवात करावे, अश्या अनेक मागण्या रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे यावेळी करण्यात आल्या आहेत. यावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अशवस्त करीत जानेवारी-2023 पर्यन्त मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे टेंडर प्रोसेस पूर्ण करून,सर्वेक्षण कामाला सुरुवात करण्यात येईल, या कोच प्रकल्पात स्थानिकांना 70 टक्के प्राधान्य देण्यात येईल. मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या उदघाटसाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांना आग्रहाने निमंत्रित केले जाणार असल्याचे , मा.अश्विनी वैष्णव यांनी अशवस्त केले आहे.

सध्या रेल्वे फॅक्टरीची निविदा प्रक्रिया सुरू असून ती पुर्ण होताच प्रत्यक्ष उद्धाटन आणि कोच निर्मितीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये ७० टक्के स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर संबंधित कंपनी सर्वेक्षणाचे काम पुर्ण करणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यासाठी पंतप्रधानांना लवकरच निमंत्रित करण्यात येणार असल्याचेही रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.
याशिवाय लातूर येथे रेल्वे पिटलाइन उभारणीसाठी मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी देखील शृंगारे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.
Comments