top of page

अग्नितांडव; उसाच्या ट्रॉलीला डिझेल टँकरची धडक; 7 गाड्या जळून खाक...


ree

लातूर- राज्यामध्ये अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे. चालकाच्या एका चुकीमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. अशीच एक अपघाताची घटना नाशिकमध्ये घडली. एका डिझेल टँकरने ट्रॅक्टरला धडक दिली. या धडकेनंतर मोठा स्फोट होऊन आगीचा मोठा भडका उडाला. हि आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली कि यामध्ये आजूबाजूच्या 7 गाडया या आगीमध्ये जळून खाक झाल्या.या दुर्दैवी घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले. नाशिकमध्ये झालेल्या खासगी बस वाहनाच्या भीषण अपघातासारखाच अपघात लातूर येथे घडला. एका डिझेल टँकरने ट्रॅक्टरला धडक दिली. या धडकेनंतर स्फोट होऊन मोठी आग भडकली होती. ही आग रस्त्यावरील इतर वाहनांमध्येही पसरली. जवळपास 7 वाहनं या भीषण अपघातामध्ये जळून खाक झाली. हा अपघात बुधवारी रात्री घडला. या दुर्दैवी घटना एक जण जिवंत होरपळला गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झालेत. दरम्यान, खासगी कार, डिझेल, टँकर याच्यासह एसटी बसच आगीत जळून खाक झाली होती. या अपघातामुळे लातूर नांदेड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नांदेड महामार्गावर भातखेडा ते भातांगळी ही दुर्दैवी घटना घडली. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इंधनाची वाहतूक करणारा ट्रक रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकला. ही धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरने रस्त्यावरच पेट घेतला. दरम्यान, यानंतर पुढचा तब्बल दीड तास महामार्गावरच अग्नितांडव पाहायला मिळालं. या अपघातात मोठं नुकसान झालं. एकूण सात वाहनं आगीत जळून खाक झालीत. त्यात एक टँकर, दोन ट्रॅक्टर, एक एसटी बस आणि एका ट्रकचा समावेश आहे. इंधनाने भरलेला टँकर लातूरहून अहमदपूरकडे जात होता. मात्र वाटेतच या टँकरची आणि उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक झाली. या धडकेनंतर काही वेळातच टँकर तर पेटलात. शिवाय आजूबाजूने येणाऱ्या दोन कारलाही आगीने आपल्या कवेच घेतलं. त्यानंतर काही कळायच्या आत भातखेड पाटी जवळ आगडोंब उसळला. एसटी आणि कारमधील प्रवाशांनी कसेबसे आपले प्राण वाचवले. पण काही जण गंभीर जखमी झाले. तर टँकरच्या चालकाच्या पायाला या अपघातात जबर जखम झाली. पण चालकाचा सहकारी मात्र आगीत जळून खाक झाला. या अपघातात जळून खाक झालेली एसटी बस ही नांदेडहून लातूरकडे जात होती.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page