शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; उदगीर रेल्वे स्थानकातून भाजीपाला निर्यातीला मंजुरी...
- MahaLive News
- Aug 23, 2021
- 1 min read

लातूर- येथील रेल्वे स्थानकातून शेतीमाल निर्यात करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने नुकतीच मंजुरी दिली. यामुळे रेशीम, भाज्या, फळे, फुले आदी छोट्या प्रमाणात असतील तरीही शेतकरी मोठ्या बाजारपेठ पर्यंत स्वस्त दरात वाहतूक करू शकतील. यापूर्वी उदगीर येथून सोयाबीन, तुरदाळ मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगाल मुंबई व दिल्लीच्या बाजारपेठेत पाठविण्यात आले रेल्वेच्या बोगी भरून येथील व्यापाऱ्यांनी शेतीमाल पाठवला होता. त्यापाठोपाठ आता भाजीपाला फुले या रेल्वेने मंजुरी दिल्याने या भागातील शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. उदगीर शहरासह सीमावर्ती भागात रेशीम शेती मोठ्या प्रमाणात असून त्याची मुख्य बाजारपेठ बंगळुरू आहे. उदगीर रेल्वे स्थानकातून दररोज बंगळुरूसाठी रेल्वेही आहे. मात्र एक्सप्रेस गाडी असल्याने माल निर्यात व्यवस्था करता येत नव्हती. त्यामुळे शेतकरी कमी भावात मोठ्या बाजारपेठ पर्यंत आपला माल वाहतूक करून विक्री करू शकत नव्हते. परिणामी स्थानिक बाजारपेठेत शेतीमालाला योग्य दर मिळत नव्हता. या बाबतीत शेतकऱ्यांनी उदगीर रेल्वे संघर्ष समितीस ही सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दक्षीण मध्य रेल्वे प्रशासनाशी संपर्क करून पाठपुरावा केला. नुकतेच दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने संघर्ष समितीस रेशीम कोषासह इतर शेती उत्पादने निर्यात करण्यासाठी अनुकूलता दर्शवली असल्याचे कळविले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य शेतकरी आपले उत्पादन उदगीर स्थानकातून देशातील मोठ्या बाजारपेठेत निर्यात करण्याची व्यवस्था उपलब्ध झाली आहे. मोदी सरकार देशातील छोट्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवत आहे. आता उदगीर व परिसरातील शेतकरी भाज्या, फळे, फुले प्रमुख शहरात त्वरित आणि कमी खर्चात आपला माल निर्यात करू शकतील. निर्यात करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी उदगीर रेल्वे संघर्ष समितीस संपर्क करण्याचे आवाहन सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी केले आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Mahalive News
Comments