सात दिवसात मोहीम काढून अवैद्य धंदे बंद करा; निखिल पिंगळे यांनी दिले आदेश...
- MahaLive News
- Jul 23, 2021
- 1 min read

लातूर- येथील ग्रामीण व शहर पोलिस ठाणे अंतर्गत चालू असलेले अवैध धंदे सात दिवसांची विशेष म्हणून काढून बंद करावेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व त्याचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गुरूवारी (ता.२२) काढले आहेत. उदगीर शहर व विशेषता ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत गुटका, मटका, दारू व जुगाराची मोठ्या प्रमाणावर उलढाल वाढली आहेत. त्यामुळे उदगीर अवैध धंद्याचे माहेरघर बनले आहे. खुलेआम मटका खेळला जात आहे यावर प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी बुधवारी मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक पिंगळेंनी लातूरच्या पोलिस अधीक्षकपदाचा पदभार स्विकारल्यानंतर तत्काळ अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही महिने उदगीर शहर व ग्रामीण हद्दीमध्ये अवैध धंदे बंद होते. मात्र ग्रामीण हद्दीत हळूहळू या धंद्याला सुरुवात झाल्याने त्याचे लोन उदगीर शहरात आले अन् पुन्हा अवैध धंदे धुमधडाक्यात सुरू झाले. वारंवार याविरुद्ध प्रसारमाध्यमांनी आवाज उठविला. याची पोलिस अधीक्षकांनी दखल घेऊन पोलिस निरीक्षकांना विशेष मोहीम काढून कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशात लॉकडाउननंतर अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या अवैध धंद्यावर ठोस कार्यवाही करून प्रतिबंध करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने शुक्रवार (ता.२३) ते ३० जुलै पर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे तरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हा शाखेचे प्रमुख अधिकारी व विशेष पथकाचे प्रमुख यांनी या मोहिमेच्या काळात अवैध धंद्यांविरुद्ध जास्तीत जास्त कारवाई करून आळा बसवावा व त्याचा अहवाल ३१ जुलै रोजी सकाळी आठ वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेच्या ईमेलवर पाठवावा असे आदेश बुधवारी निर्गमित केले आहेत.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Mahalive News
Comments