Search
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दिशेने रवाना...
- MahaLive News
- Jul 22, 2023
- 1 min read

महालाईव्ह न्यूज | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री अचानक दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा नाही. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे अजित पवार हे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स झळकले आहेत. अमोल मिटकरी यांनी केलेले ट्विट यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? असे तर्क वितर्क लावले जात आहेत.
Comments