top of page

राज्यात पाऊस, गारपिटीमुळं तब्बल 80 हजार हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान...


ree

राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं जमिनदोस्त झाली आहेत. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. कृषी विभागातील अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'आतापर्यंत 80,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पीक नुकसानीमुळं प्रभावित झालं आहे. नुकसान तपासण्यासाठी पंचनामे प्रक्रिया अद्याप सुरू आहे.'


उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावलीये. रब्बी पिकांव्यतिरिक्त संत्री, केळी, डाळिंब, द्राक्षे यांच्या लागवडीलाही फटका बसला आहे. गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केल आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात आढळली साडेआठ फुटाची अंदाजे 100 किलोची मगर.
bottom of page