राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील निलंबित; सभागृहात सर्वात मोठा निर्णय...
- MahaLive News
- Dec 22, 2022
- 1 min read

नागपूर- हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्द बोलल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. यासंदर्भातील ठराव मंत्री चंद्रकात पाटील यांनी मांडला. सभागृहात विविध प्रश्नांवर बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल असंवैधानिक' शब्दाचा उल्लेख केला होता.
त्यानंतर सभागृहात लगेचच जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर या प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील सभागृहात दिलगिरी व्यक्त केली होती. तदनंतर विरोधकांकडून या प्रकरणी आवाज उठविण्यात आल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबतचा ठराव मांडला. विरोधकांकडून जयंत पाटील यांना 1 वर्षांसाठी निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली, मात्र, हिवाळी अधिवेशन संपेपर्यंतच जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत छोटेखानी सभा घेण्यात सुरु असून ही सभा संपल्यानंतर निलंबन मागे घेण्यात येणार का? की निलंबनाचा कालावधी वाढवण्यात येणार? याबाबत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांबद्दल पाटील यांनी असंवैधानिक शब्दाचा उल्लेख केला होता. त्यानंतर अजित पवारांनी विरोधकांकडून दिलगिरी व्यक्त करुन सभात्याग करण्यात आली होती.
Comments