व्हॉटस्ॲप चॅनेलचा वापर आता महाराष्ट्रातील मंत्र्यांकडूनही सुरू; जनतेला मिळणार निर्णय...
- MahaLive News
- Sep 21, 2023
- 1 min read

मुंबई- व्हॉटस्ॲपचे नवीन ऑप्शन व्हॉटस्ॲप चॅनेलचा वापर आता महाराष्ट्रातील मंत्र्यांकडूनही सुरू करण्यात आला आहे. एक्स (टि्वटर), इन्स्टाग्रामप्रमाणेच आता व्हाॅटस्ॲपवरून थेट जनतेपर्यंत पोहोचता येणार आहे. याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्य व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली असून अन्य मंत्र्यांकडूनही हे चॅनेल सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. व्हॉटस्ॲपचे नवे ऑप्शन आता मोबाइलवर उपलब्ध झाले आहे. मंत्रीही या ऑप्शनद्वारे व्हाॅटस्ॲपवर उपलब्ध झाल्याने त्यांना व्हॉटस्ॲपवर फॉलो केल्यावर त्या-त्या मंत्र्यांनी आपापल्या खात्यात घेतलेल्या निर्णयांची माहिती आणि संबंधित बातम्या आपल्याला पाहता येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘CMO Maharashtra’ या व्हॉटस्ॲप चॅनेलचा श्रीगणेश केला असून ४० हजार फॉलोअर्स लाभले आहेत.
‘Find channels’ मध्ये ‘CMO Maharashtra’ हे टाइप केल्यावर चॅनेलच्या यादीमध्ये हे चॅनेल दिसणार आहे.
Comments