जागतिक चिमणी दिवस; जाणून घ्या पहिला चिमणी दिवस कधी होता...
- MahaLive News
- Mar 21, 2023
- 1 min read

लातूर- आज जागतिक चिमणी दिन आहे. आज 20 मार्च ‘जागतिक चिमणी दिवस’ जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा आजचा दिवस. पहिला जागतिक चिमणी दिन 2010 मध्ये जगाच्या विविध भागात साजरा करण्यात आला. मात्र गाव-शिवारातून चिमण्या कमी होत चालल्या आहेत. शहरात चिमणी शोधावी लागते. पुढे मुलांना फोटोतच चिमण्या दाखवाव्या लागतील की काय, अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे.

आज २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो, या दिनाचे औचित्य साधून, पक्षिमित्र महेबुब चाचा यांनी, दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही आपल्या कमाईतील कांही हिस्सा, मुक्या जिवांच्या सेवेत लावला असुन, कांहीं मातीच्या कुंड्या नागरिकांना भेट दिल्या, याच बरोबर टिवीशन ईरीया परिसरातील, चिमण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून, त्या परिसरात असलेल्या झाडांन वरती कुंड्या बांधण्यात आल्या, या वेळी आर, सी, सी, क्लास चे आदरणीय श्री.मोटेगावकर सर त्यांचा मित्र परिवार आणि स्टाफचा शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

झाडांना बांधलेल्या मातीच्या कुंड्यान मधे, मोटेगावकर सरांनी पाणी भरून ठेवताना,आपल्या स्टाफच्या माणसाना, या कुंड्यान मधे दररोज पाणी भरुन ठेवण्याच्या सूचना केल्या, तसेच महेबुब चाचांच्या कार्याचे कौतुक करत, त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या मान्यवर मित्र परिवाराला, चाचांचा परिचय करुन दिला, आणि महेबुब चाचा करत असलेल्या कार्याचे बक्षीस म्हणून मोटेगावकर सरांनी चाचांना दहा हजार रुपयांचे एक बंद पाकीट भेट दिले.

उन्हाचा दाह वाढल्याने या पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी घरात किंवा अंगणात पाण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी एखादे मातीचे भांडे पक्ष्यांना पाणी पिणे शक्य होईल अशा ठिकाणी ठेवावे. पक्षांना लागणारे धान्य दररोज त्यांना उपलब्ध होईल अशा पद्धतीने टाकणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे. या पक्षांसाठी कमीत कमी दहा फुट उंचीवर लाकडाचे किंवा कपट्याचे कृत्रिम घरटे तयार करावे.
Comments