top of page

प्रकल्प बाहेर नेऊन बेरोजगारांच्या हातचा घास हिरावून घेतला; सुषमा अंधारे...


ree

मुंबई- राज्यातून प्रकल्प बाहेर पळवले जात आहेत, उद्योगधंदे बाहेर गेल्याने लाखो बेरोजगारांच्या हातचा घास हिरावून घेण्याचं काम सुरु शिंदे-फडणवीस सरकारकडून केलं जात असल्याचा हल्लाबोल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील प्रकल्प पळवून नेलेत, आता कर्नाटकाच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे गावं पळवायला यांनी सुरुवात केलीय, असंच सुरु राहिलं तर महाराष्ट्रासाठी आम्ही आहोत म्हणणारे देवेंद्र फडणीस कधी बोलणार आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस हे भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनांच चॅलेंज करुन शकतात, तशी त्यांची वाटचाल सुरु असल्याचे अंधारे म्हणाल्या.

भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असताना त्यावर फडणवीस काहीही बोलत नसल्याचेही त्या म्हणाल्या. उद्धव ठाकरे यांना सत्तेतून दूर करण्यासाठी काही कपटी लोकांनी पाठीत खंजीर खुपसला. पण आम्हाला उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहायचे. काही म्हणतात, सुषमा अंधारेंकडे आम्ही लक्ष देत नाही, लक्ष देत नाही तर एका दिवसात माझ्यावर पाच पाच कॅबिनेट मंत्र्यांना का बोलावं लागतं? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला.

सध्या महिलांचे प्रश्न ऐरणीवर असताना याबाबत देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नाहीत, भाजप ईडीचा दुरुपयोग करुन एक एक पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला शिवसेना नाहीतर सर्वच पक्ष संपवायचे असल्याचे अंधारे म्हणाल्या.

गुजरातमध्ये निवडणुका आल्या की, आपले उद्योग पळवले. दरम्यान, कर्नाटकच्या निवडणुका लागल्या की, त्यांनी महाराष्ट्रातील गाव पळवायला सुरुवात केली. जर अशाच पद्धतीनं सुरु राहीलं तर महाराष्ट्रासाठी आम्ही आहोत असं म्हणणारे फडणवीस कधी बोलणार? असा सवाल अंधारेंनी केला.


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page