top of page

नगर जामखेडजवळ भीषण अपघात, प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचा मृत्यू...

ree

जामखेड- दिवसेंदिवस रस्ते अपघाताची संख्या वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री यांचा अपघातात मृत्यू झाल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. अहमदनगर जामखेडचे प्रसिद्ध भांडे दुकान व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्यासोबत प्रवास करणारे तीन गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देवदर्शन आवरून परत येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. पोखरी जवळ कार उलटल्याने हा अपघात घडला आहे. अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र, त्यानंतरही अशा घटना कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. अहमदनगर जामखेडचे प्रसिद्ध भांडे दुकान व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघाती निधन झाले असून तीन गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देवदर्शन आवरून परत येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला.


व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघातात निधन झाले असून गाडीत आसलेल्या त्यांच्या पत्नी रेखा महेंद्र बोरा, सुन जागृती बोरा आणि नातू भुषण बोरा हे गंभीर जखमी झाले. जखमींवर जामखेड येथिल समर्थ हॉस्पिटल येथे तातडीने प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नगरला आल्यात आले आहे. जामखेड येथील भांड्याचे प्रसिध्द व्यापारी महेंद्र बोरा हे आपल्या कुटुंबासमवेत देवदर्शनासाठी राजस्थानला गेले होते. येथुन देवदर्शन करुन जामखेडकडे परत येत असताना नगर जामखेड रोडवरील पोखरी जवळ भिषण अपघातात झाला.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page