top of page

भूजल जागृती चित्ररथाचा जिल्हाधिकारी पृथ्‍वीराज बी.पी. यांनी हिरवी झेंडी दाखवून केला शुभारंभ...


ree

लातूर- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून भूजल जागृती शभुरंभ करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्यकारी अधिकारी संतोष जोशी,उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे,उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे,सर्व सहसिलदार,गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, व जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.बी.एन.संगमवार यांची उपस्थिती होती. जिल्हयातील चार तालुक्यातील 161 गावांचा अटल भूजल योजनेंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे.लातूर,चाकूर ,रेणापूर आणि निलंगा या तालुक्यातील 121 ग्रांमपंचायतीमधील 136 गावांचा समावेश असून या सर्व गावांचे या सर्व गावांचे जलसुरक्षा आराखडे तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शाश्वत स्वरूपात भूजलाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून भूजल जागृती हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सतत घसरत जाणारी भूजल पातळी आणि नियमित स्वरूपाचे पर्जन्यमान आणि विविध बाबींसाठी होणारा भूजलाचा उपसा ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. भूजल मूल्यांकन 2017 नुसार अतिशोषित/अंशता घोषित करण्यात आलेल्या गावांपैकी 136 गावांमध्ये भूजल जागृती करणे, जलसुरक्षा आराखडे तयार करणे, अभिसरण अंतर्गत विविध खात्यांच्या उपाययोजनांचा समावेश करून भूजल पुनर्भरण करणे, पीक पाणी व्यवस्थापन करणे, ग्रामस्तरीय पाणलोटातील पाण्याचा ताळेबंद करणे अशा विविध बाबींचा समावेश असणारा प्रत्येक गावांचा जलसुरक्षा आराखडा तयार करण्याचे काम भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने हाती घेतलेले आहे.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज लातूर

ree

Mahalive News


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

bottom of page