Search
मोफत वाटपासाठी रेशनचे धान्य घेऊन जाणारा ट्रक अकोले तालुक्यात पलटी...

अकोले- मोफत वाटपासाठी रेशनचे तालुक्यातील आंबित, धामनवन, सावरकुटे या भागातील आदिवासी जनतेचे ऑगस्ट महिन्याचे मोफत वाटप करावयाचे धान्य या ट्रक मधून पोहच केले जात होते. मात्र सावरकुटे गावाजवळ अरुंद रस्त्यामुळे ट्रक शेतात पलटी झाला. गुरुवारी दुपारी (ता.१९) ही घटना घडली. या ट्रकमध्ये गहू, तांदूळच्या सुमारे तीनशे गोण्या होत्या. मोफत धान्य वितरण योजनेतील धान्य ट्रक घेऊन जात होते. पुरवठा विभागाला ही माहिती मिळताच पर्यायी व्यवस्था करून हे धान्य पाठविण्यात आले. या दुर्घटनेत एम एच 14 बीजे 14 14 या ट्रक चे मोठे नुकसान झाले. मात्र जीवितहानी झाली नाही.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज अकोले
Mahalive News





















Comments