top of page

शेतकऱ्यांना आता पंचनामे करावे लागणार नाही; सॅटेलाईटद्वारे थेट होणार पंचनामे; उपमुख्यमंत्री...


ree

राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आलं आहे. पिकांची अक्षरशः नासाडी झाली आहे. अशातच शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा सरकारकडे लागून राहिल्या आहेत. सरकारने आज शेतकऱ्यांसाठी एका नव्या योजनेची घोषणा केली आहे.

नुकसानीचे तात्काळ पंचनामे थेट सॅटेलाईट पद्धतीने करणार. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर उभं आहे. दीड महिन्यांमध्ये सात हजार कोटींची नुकसान भरपाई मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितलं. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आले. याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

साडेचार हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. तसंच कालपर्यंत झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे केले जातील, तसंच आपल्याकडे पाठवल्यास लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतीच्या नुकसान भरपाईची योजना सॅटेलाईट बेस होणार आहे. ज्यामुळे शेतीत नुकसान झाल्यावर कोणालाही पंचनामा करावा लागणार नाही. उपग्रहाच्या माध्यमातून थेट घटनास्थळाची माहिती मिळेल आणि त्यानंतर ऑटो पायलट मोडवर मदत दिली जाईल. लवकरच अशा प्रकारची सिस्टीम उभारली जाणार आहे.


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page