top of page

शिवसेनेचा 55वा वर्धापन सोहळा; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार शिवसैनिकांशी ऑनलाइन संवाद...


ree

मुंबई- शिवसेनेचा शनिवारी 55वा वर्धापनदिन आहे. दरवर्षी हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा होतो. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे वर्धापनदिनाचा कार्यक्रम परंपरेप्रमाणे करता आला नाही. यंदाही दुसरी लाट धडकली. ती शांत होत असली तरी पुन्हा उसळू नये म्हणून गर्दी टाळण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. कोरोनाने श्वास घेणे कठीण केले असले तरी श्वासाश्वासात शिवसेना आहे. शिवसेना 55 वर्धापनदिन सोहळा होणार नाही.

ree

तरी कोरोनाशी दोन हात करण्यात यशस्वी ठरलेले शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या वर्षीप्रमाणेच वर्धापनदिनानिमित्त शिवसैनिकांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. मुंबईत सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष यांच्यात तुफान राडा झाल्याचा प्रकार बुधवारी (16 जून) घडला. राम मंदिराच्या जमीन खरेदीदरम्यान भ्रष्टाचार करण्यात आल्याची टीका शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात करण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. दरम्यान, शिवसेना कार्यकर्तेही त्यांच्यासमोर आले. त्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाल्याचं दिसून आले. आंदोलनादरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारीची घटनाही यादरम्यान दिसून आली. या सगळ्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी काय सवांद साधणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज मुंबई

ree

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page