अधिवेशनात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे नागपुरात दाखल; नागपुरात येताच उद्धव ठाकरे ऍक्शनमध्ये...
- MahaLive News
- Dec 19, 2022
- 1 min read

नागपूर- उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत. काही वेळातच विधान भवनात पोहचणार आहेत. आणि आल्यानंतर ते शिवसेनेच्या आमदारांची एक बैठक घेणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूरमध्ये दाखल होताच उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. हॉटेल रेडिसनमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला घेरण्याच्या दृष्टीने या बैठकीत तयारी होणार आहे. दरम्यान महाविकासआघाडीची आज चार वाजता होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. आजच्याऐवजी ही बैठक आता उद्या सकाळी 9 वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे.
या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. महाविकासआघाडीच्या या बैठकीआधी उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाची रणनीती ठरवणार आहेत.
नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे, त्यामुळे आता विधिमंडळात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला सामना बघायला मिळू शकतो. शिवसेनेत झालेल्या भुकंपानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोरासमोर येणार आहेत.
Comments