top of page

राजकारण; नव्या EVM मशीनवर होणार मतदान; १,३३५ कोटी रुपयांचं बजेट...


ree

यंदाच्या वर्षात ९ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ज्यात ५ मोठ्या राज्यांचा समावेश आहे. तसंच पुढच्या वर्षी देशात लोकसभा निवडणूक होणार आहे. २०२३ आणि २०२४ ही दोन वर्ष भारतीय राजकारणासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नव्या ईव्हीएम मशीन्ससाठीची ऑर्डर दिली आहे. या सर्व मशीन्स सरकारी कंपन्यांकडून खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोन कंपन्यांना ऑर्डर देली आहे. कॅबिनेटमध्ये नव्या ईव्हीएम सोबतच VV PATs ना अपग्रेड करण्यासही मंजुरी मिळाली आहे. अपग्रेडेशन अंतर्गत VV PATs ना M2 हून M3 मध्ये रिप्लेस केलं जाणार आहे. दोन्ही कंपन्यांना कॅबिनेटकडूनही मंजुरी मिळाली आहे. सरकारनं इव्हीएम मशीन्ससाठी १,३३५ कोटी रुपयांचं बजेट ठेवलं आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page