भीषण अपघात; विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात; एक ठार, 37 जखमी, 8 गंभीर...
- MahaLive News
- Jan 18, 2023
- 1 min read

सोलापूर- पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकाच्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विजापूरहून पंढरपूरच्या दिशेने ही बस निघाली होती. चालकाचा बसच्या स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने बसला अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार तर 35 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरु आहे. विठूरायाच्या दर्शानासाठी निघालेल्या बसला भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे.
या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. उमदीहून मंगळवेढामार्गे पंढरपूरकडे जाताना येद्राव फाटा येथे हा अपघात झाला आहे. अपघातात जखमी प्रवाशांना सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व प्रवाशी हे मध्य प्रदेश येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Comments