top of page

सावरकरांचा अपमान; महाविकास आघाडीत फूट पडू शकते, संजय राऊत

ree

मुंबई- काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यानंतर शिंदे गट आणि भाजपने ठाकरे गटावरही निशाणा साधायला सुरुवात केली. सावकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत ठाकरे गट जात असल्याची टीका केली जात असतानाच आता संजय राऊत यांनी या प्रकरणावर अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींनी मध्येच वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची गरज नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते, असा थेट इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आल आहे. वीर सावरकर हे नेहमीच आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत आणि नेहमी राहतील. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनीही स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलं, की वीर सावरकरांची कोणत्याही प्रकारे बदनामी, चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना ते सहन करणार नाही. त्यांनी वीर सावरकरांबाबतचं अशाप्रकारचं वक्तव्य खपवून घेणार नसल्याचं सांगत महाविकास आघाडी फूट पडू शकते असा थेट इशारा दिल्याने त्यांचं हे विधान चांगलंच चर्चेत आल आहे. उद्धव ठाकरे यांनी आपण राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हे सांगतानाच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. स्वातंत्र्य आंदोलनात भाजप आणि त्यांची संघ कुठे होता? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात आढळली साडेआठ फुटाची अंदाजे 100 किलोची मगर.
bottom of page