मतदान ओळखपत्रास आधार क्रमांक जोडणी कार्यशाळेस प्रतिसाद...
- Venkat Rautrao
- Sep 18, 2022
- 1 min read

लातूर- येथील श्रीमती सुशिलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालय लातूर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तहसील कार्यालय लातूर यांच्या वतीने दि. १५ सप्टेंबर रोजी कार्यशाळा झाली. कार्यशाळेस चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुलदीप देशमुख उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करताना उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले की, हा उपक्रम राष्ट्रीय कर्तव्याचा भाग असून सर्व विद्यार्थ्यांनी यांच्या त्यांच्या पालकांचे, नातेवाईकांचे आधार क्रमांक मतदान ओळखपत्रला जोडून घ्यावे, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी अध्यक्षीय समारोप करताना आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी राष्ट्रीय कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असतात. तसेच अधिकारांपेक्षा कर्तव्यांना अधिक महत्त्व देणारे असून, आधार जोडणी कार्यक्रम यशस्वी करतील असे सांगितले.
प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. जी. एस. देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पलमंटे एम. पी. यांनी केले. या कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्याबरोबरच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
Comments