कर्नाटक निवडणुकीच्या निकालाबाबत शरद पवारांकडून महत्वाचं निरीक्षण; केलं पक्षातील नेत्यांना सावध...
- MahaLive News
- May 17, 2023
- 1 min read

कर्नाटकच्या निकालानंतर राज्यातील महाविकास आघाडीतील पक्षांनाही उर्जा मिळाली आहे. कर्नाटक निकालमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचे सर्वच नेते अॅक्टिव्ह झाले आहेत. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षांनी आतापासून कंबर कसायला सुरुवात केली आहे. राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवारांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं. कर्नाटकात काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना पराभव सामोरे जावे लागलं, असं निरीक्षण शरद पवार यांनी नोंदवलं.
भाजपने कर्नाटकमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला म्हणून जनतेने त्यांना नाकारले. आमदार फुटून जाऊन भाजपला मदत करतील अशी स्थिती ठेवली नाही, त्यामुळे स्पष्ट बहुमत काँग्रेस पक्षाला मिळाले. यातून मतदारांचा कौल दिसून येतो, असं शरद पवार यांनी सांगितलं. अशारितीने पक्ष सोडून जाण्याच विचार करणाऱ्या नेत्यांना शरद पवार यांनी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रतील परिस्थितीचा अप्रत्यक्षपणे अंदाज दिला. काँग्रेस पक्ष सोडून भाजप बरोबर गेलेले किंवा भाजपला मदत करू शकणाऱ्यांना जनतेने नाकारले, असं शरद पवारांनी निरीक्षण नोंदवलं.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविकास आघाडी भक्कम ठेवा, लोकसभा आणि विधानसभा एकत्रितच लढवायच्या आहेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जे तीन वर्षांपेक्षा जास्त जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षपदावर आहेत, त्यांना बदलण्यात येणार. विभागवार शिबिरे घेण्यात येणार, तिथे राज्यातील प्रश्नांवरच चर्चा होणार. राष्ट्रवादीची १० जून रोजी मोठी सभा होणार.
Comments