Search
लातुरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम तीव्र; गंजगोलाई भागातील अतिक्रमणावर हातोडा...
- MahaLive News
- May 17, 2023
- 1 min read

लातूर- लातुरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम तीव्रकरण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. गंजगोलाई भागात असलेले अतिक्रमण आज हटविण्यात आले. भुसार लाईन, सराफा लाईन, चुरमुरे लाईन परिसरात असलेले अतिक्रमण काढण्यात आले असून जेसीबी व अतिक्रमण विभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी स्वतः हाथगाडे तसेच कायमस्वरूपी थाटलेल्या दुकानांवरील अतिक्रमण करण्यात आले न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही मोहीम राबविण्यात येत आहे.
सर्व अतिक्रमणे काढून त्याबाबतचा अहवाल लातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला न्यायालयाला सादर करायचा आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. अतिक्रमण पथकामध्ये अतिक्रमण विभागाचे प्रमुख रवी कांबळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
Comments