top of page

औसा तालुक्यात शेतकऱ्याच्या मुलाचा पिकाला पाणी देताना विजेचा धक्का लागून मृत्यू...


ree

लातूर- औसा तालुक्यातील भादा गावात शेतकऱ्याच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. रात्री वीज आल्यानंतर पिकाला पाणी देण्याच्या निमित्ताने शेतात गेला होता. पिकाला पाणी देण्यासाठी विद्युतपंप चालू करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. उद्धव आत्माराम जाधव (वय 41) असे या मयत शेतकऱ्याचे नाव असून महावितरणाच्या वेळानुसार भादा फिटरवर रात्रीची वीज होती. त्यामुळे पिकाला पाणी देण्यासाठी तो मंगळवारी 29 रोजी शेतात मुक्कामी राहण्यासाठी गेला होता. त्याचबरोबर रात्री साडे बाराच्या सुमारास विद्युतपुरवठा सुरु झाल्यावर विद्युतपंप चालू करण्याच्या निमित्ताने त्यांनी बोर्डावरील बटण दाबले असता विजेचा जोरदार धक्का लागला. ही घटना सकाळी सर्व गावाकऱ्यांना आणि मयताच्या कुटुंबाला समजली. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. हा मयत मुलगा अतिशय गुणी आणि कष्टकरी असल्याचे समजत आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक भाऊ, आणि भावजय असा परिवार आहे.


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज लातूर

ree

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page