राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चिट्टी दाखवली वाचून | अकोल्यात माध्यमांशी संवाद...
- MahaLive News
- Nov 17, 2022
- 1 min read

अकोला- मागील आठ वर्षांमध्ये भारतात भीती पसरवली जात आहेत. भाजप नेते देशातल्या शेतकऱ्यांशी आणि युवकांशी बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रश्न कळत नाहीत. म्हणून आम्ही भारत जोडो यात्रा सुरु केली. ही यात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर, अशी जाणार आहे. अकोला येथून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महात्मा गांधी यांनी देशाला रस्ता दाखवला. देशाला लढण्याची प्रेरणा गांधींनी दिली. त्यामुळे ही आजची लढाई समजून घेणं गरजेचं आहे. भाजपचा मीडियावर कंट्रोल आहे, न्यायव्यवस्थेवर आणि संस्थांवर दबाव आहे. आम्हांलादेखील संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही. म्हणूनच हा लढा स्वातंत्र्याचा असल्याचं गांधी म्हणाले. या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी पत्रकारांना मराठीतून प्रश्न विचारण्याचं आवाहन केलं. न समजलेले प्रश्न त्यांनी नाना पटोले आणि इतर काँग्रेस नेत्यांकडून समजून घेतले. महाराष्ट्रामध्ये २० पटसंख्येखालील शाळा बंद केल्या जात आहेत, पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय पर्याय नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांची चिठ्ठी यावेळी वाचून दाखवली. पहा विडिओ-
''सर मी आपला नौकर राहू इच्छितो'' हे चिठ्ठीतील वाक्य त्यांनी वाचून दाखवलं. सावरकरांनी इंग्रजांना ही चिठ्ठी भीतीपोटी लिहिल्याचं राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी यात्रा रोखून तर दाखवा, असंही राहुल गांधींनी थेट आव्हान दिल.
Comments