top of page

महापालिकेच्या निवडणुकीत भाजप देणार 80 टक्के तरुणांना संधी; संभाजी पाटील निलंगेकर यांची घोषणा...


ree

लातूर- भाजपा युवा मोर्चा व युवा वॉरियर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण केलेले आहे. सामाजिक कार्यामध्ये तरुणांचीच फळी सक्रियपणे काम करीत आहे. या तरूणांच्या संघटनाच्या जोरावर आपण काम करीत आलेलो आहोत. त्यामुळे या कार्यकर्त्यांना काम करताना खाली मान घालण्याची वेळ येऊ देणार नाही. येत्या काही महिन्यावर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकामध्ये 21 ते 35 वयोगटातील व सामान्यातला सामान्य गटातील 80 टक्के तरूणांना संधी देणार असल्याची घोषणा माजी मंत्री व आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे केली. येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा व महात्मा बसवेश्‍वर मंडल युवा मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात युवकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश कार्यकारीणीचे निमंत्रित सदस्य माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, शैलेश लाहोटी, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, सरचिटणीस मनिष बंडेवार, महानरगपालिकेचे सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे, माजी उपमहापौर देविदास काळे, स्थायी समितीचे सभापती दीपक मठपती, भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर उपस्थित होते. जिल्ह्यात ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोनाच्या काळात अनेकांचा मृत्यू झाला. रेमडेसिव्हीरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. याला विद्यमान पालकमंत्रीच जबाबदार आहेत, अशी टीका त्यांनी केली. यावेळी युवा वॉरियर्सच्या 14 शाखांच्या पदाधिकार्‍यांना नियुक्‍तीपत्रांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक सुरक्षा समितीच्या अध्यक्षपद मिळाल्यामुळे भारताचा प्रभाव वाढलेला आहे, असे मत श्री. कव्हेकर यांनी व्यक्त केले. बुथ पॅटर्नमुळे महपालिकेत भाजप झिरो टू हिरो झाली. त्यामुळे यापुढील कालावधीतही शहरामध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बळावर आणखी बुथ मजबूत करून हा पॅटर्न पॅटर्न राज्यात निर्माण करु, असा विश्‍वास मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अब्दुल गालिब शेख यांनी केले तर आभार भाजयुमोचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश गोजमगुंडे यांनी मानले.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज लातूर

ree

Mahalive News


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page