top of page

लातूर जिल्यात आतापर्यंत म्युकरमायकॉसिसचे एकुण 462 रुग्ण; 81 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया...


ree

लातूर- येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामध्ये म्युकरमायकॉसिस या आजारांच्या एकूण ४६२ रुग्णांची आजपर्यंत तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये कान नाक घसा विभागामध्ये एकूण ४४४ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ८१ रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली. या शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात झाल्या असत्या तर सरासरी चार लाखांचा खर्च गृहित धरला तर या रुग्णांचे किमान सव्वा तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे वाचले आहेत. कोरोना झाल्यानंतर रुग्णांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यात म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराचा अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत यावर यशस्वीपणे उपचार केले जात आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम हे उपचार करीत आहे. यातूनच आतापर्यंत ८१ जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

ree

यात एका एका रुग्णावर वेगवेगळ्या दोन तीन शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. आजपर्यंत ५५ रुग्णांवर नाकाच्या श्वास घेण्याच्या ठिकाणच्या हवेच्या पोकळ्या काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली; तसेच ४४ रुग्णांवर टाळूचा जबडा काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दोन रुग्णांवर डोळ्यांच्या खालील हाडाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली. आजपर्यंत १८ रुग्णांना डोळ्यांच्या पाठीमागे ॲम्फोथेरेसिन बी हे इंजेक्शन देऊन रुग्णांच्या डोळ्यांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. सहा रुग्णांमध्ये बुरशी बाधित डोळा काढून टाकण्यात आला आहे. म्युकरमायकॉसिस या आजारासाठी आतापर्यंत १ हजार ३०६ इंजेक्शनचा वापर करण्यात आला. सध्या १६० इंजेक्शन या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या संस्थेत म्युकरमायकोसिसचा उपचार सुरू असताना १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नऊ रुग्णांचा मृत्यू हा पोस्ट कोविडच्या गुंतागुंतीच्या आजारामुळे झाला आहे. ३ रुग्णांचा मेंदूमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.


- म्युकरमायकोसिसच्या एकूण शस्त्रक्रिया : ८१

- उपचार सुरू असताना मृत्यू : १२

- मेंदूमध्ये बुरशीचा प्रादूर्भाव झाल्याने मृत्यू : ३

- नाकातील हवेच्या पोकळ्या काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया : ५५

- टाळूचा जबडा काढण्याच्या शस्त्रक्रिया : ४४

- बुरशी बाधित डोळा काढून टाकण्याची शस्त्रक्रिया :


काळया बुरशीची लक्षणे ही सामान्यत: नाक कोंडणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, तीव्र डोकेदुखी, गालदुखी, दात हलु लागणे व टाळुला जखम होणे अशी आहेत. ही लक्षणे दिसुन येताच रुग्णांनी तात्काळ कान नाक घसा विभागामध्ये तपासणी करुन घ्यावी असे आवाहन डॉ. सुधीर देशमुख, विभागप्रमुख कान नाक घसा डॉ. विनोंद कंदाकुरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे,विभागप्रमुख बधिरीकरणशास्त्र डॉ. शैलेंद्र चौहाण, विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभागडॉ. निलिमा देशपांडे, विभागप्रमुख दंतचिकित्साडॉ. रितेश वाधवानी, सहयोगी प्राध्यापक नेत्रविभागडॉ. नंदकुमार डोळे, डॉ. प्रदीप खोकले यांनी केले आहे.


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज लातूर

ree

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page