लातूर जिल्यातील औसा शहरात लॉटरी दुकानाला आग; पाच लाखांचे नुकसान...
- MahaLive News
- May 15, 2023
- 1 min read

लातूर- औसा शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागील भागात असलेल्या कालन गल्लीतील ऑनलाइन लॉटरी दुकानाला रविवारी रात्री ९:४५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये दुकानातील साहित्य भस्मसात झाले. आगीचा भडका उडाल्याने अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत दुकानातील साहित्याची राख झाली होती. या आगीत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानचालक कलीम शेख यांनी दिली.
औशात अनेक वर्षांपासून कलीम शब्बीर शेख हे ऑनलाइन लॉटरी दुकान चालवतात. रविवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी परतले. त्यानंतर थाेड्याच वेळात दुकानाला आग लागल्याचा निराेप मिळाला. यामध्ये कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, एलईडी, इन्व्हटर, बॅटरी, कूलर, पंखे, टेबल, खुर्च्या, पत्रे यासह इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाचा बंब बाेलावण्यात आला मात्र ताे घटनास्थळी येईपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. आग आटाेक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानासाेबतच स्थानिक तरुण धावल्याने मोठा अनर्थ टळला.
Comments