top of page

लातूर जिल्ह्यात वातावरणात गारवा; जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी...


ree

लातूर- राज्यातील वातावरणातसातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणावत आहे तर कुठे अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. मागील आठ ते दहा दिवसापासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यातही अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली. त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.


दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार लातूर जिल्ह्यातील लातूर शहर,औसा, निलंगा, वलांडी परिसरात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. वाऱ्यामुळं अनेक ठिकाणच्या लाईट गुल झाली आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन पडले होते. त्यानंतर दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळं उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं जिल्ह्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जातेय.


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळं शेतकरी मात्र, चांगलेच हवालदिल झाले आहेत. कारण हाती आलेली पिकं या पावसामुळं वाया जात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

सुरक्षित, समृद्ध आणि स्वच्छ निलंगा शहरासाठी - "भव्य विजय संकल्प सभा' | Mahalive Special Report
bottom of page