top of page

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ऊस तोडणी यंत्र खरेदीच्या आर्थिक सहाय्य प्रस्तावाला मंजुरी...


ree

मुंबई- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलीय. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला केंद्रीय कृषी मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारनं मंजुरी दिली.


या योजनेचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिलीय. ट्विट करून नितीन गडकरी यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय कृषी मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारनं मंजुरी दिलीय. या योजनेचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरणाच्या मदतीनं शेतकरी आपला ऊस लवकरात लवकर साखर कारखान्यांकडं पाठवू शकतील आणि उसाचं वजन कमी होण्याच्या शक्यता टाळता येतील.


त्याचबरोबर वेळेवर मोबदला मिळवू शकतील. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं ट्विट नितीन गडकरी यांनी केल. वेळेवर ऊसतोडणी न झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसात होत असल्याचं पाहायला मिळतं. तोडलेला ऊस वेळेवर कारखान्यापर्यंत न पोहोचल्यास त्याचं वजन कमी होऊन शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसतो. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक मदत केल्यास शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळता येणार आहे. त्यामुळं सरकारनं याचा निर्णय घेतलाय.


त्यामुळं उसाचं वजन कमी होण्याची शक्यता टळेल. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर ऊस तोडणीचा प्रश्न होता. सरकारच्या या निर्णयामुळं आता शेतकऱ्यांची चिंता मिटणार असल्याचा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला.


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page