top of page

लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावरून व्यक्तीने मारली उडी...

Updated: Jun 15, 2021


लातूर- शहरातील मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावरून आज सोमवार दिनांक १४ जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गायकवाड नावाच्या एका माथेफिरू व्यक्तीने उड्डाणपुलावरून उडी मारली असून यामध्ये त्याचा एक पाय मोडला आहे तर यातून तो बचावला आहे. उडी मारल्यापासून बराच वेळ तो तडपडत होता मात्र येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी त्याची मदत न करता त्याला पाहून निघून जात होती.

दरम्यान तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचून गायकवाड नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ऑटो मध्ये घालून उपचारासाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले मात्र या माथेफिरू व्यक्तीने उड्डाणपुलावरून उडी का मारली याबाबत अजूनही स्पष्ट झालेले नाही परंतु उड्डाणपुलावरून उडी मारल्याने त्याने एक पाय पूर्णपणे गमावला आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत.


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज लातूर


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

विजय संकल्प सभा- मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा...
bottom of page