top of page

बँक ऑफ महाराष्ट्र लातूर मुख्य शाखेकडून माजी सैनिकांचा सत्कार...


लातूर- आझादी का अमृत महोत्सव निम्मित देशभर विविध कार्यक्रम होत असताना बँक ऑफ महाराष्ट्र च्या लातूर मुख्य शाखेकडून आज दि. 12/8/22 रोजी ग्राहक सभा आयोजित करून त्यात 20 माजी सैनिकांना मानपत्र, शाल, आणि तिरंगा झेंडा देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्क्रमाला बँकेचे उप क्षेत्रीय व्यवस्थापक संजीव वांगवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. ललितभाईजीं शाह, धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. देश्याच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्या देशावर अनेक युद्ध लादली गेली त्या प्रत्येक वेळी तुम्ही सैनिकांनी देशाचे, देशातील प्रत्येक नागरिकांचे संरक्षण केले आणि या देशाचे स्वतंत्र अबाधित राखले म्हूणन बँक ऑफ महाराष्ट्र आपली सर्वांची ऋणी आहे अश्या शब्दात श्री. वांगवाड यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सदरील कार्क्रमाचे प्रास्ताविक दिपक माने यांनी तर सूत्रसंचालनं आदित्य देशपांडे यांनी केले. सर्व माजी सैनिकांचे आभार राधिका मुंदडा यांनी मानले.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

मा.श्री.मनोज जरागे पाटील यांच्या उपस्थितीत श्री.हनुमान आराधना कार्यक्रमाचे आयोजन (माकणी थोर, लातूर)
bottom of page