top of page

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर; महाआरोग्य शिबिराचे आयोजन...


ree

महालाईव्ह न्यूज । छत्रपती संभाजीनगर- उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार असून, महाआरोग्य शिबिराला ते हजेरी लावणार आहेत. फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या अयोध्या मैदानावर या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर यासाठी फडणवीस हे आज शहरात येणार आहेत. साडेदहा वाजता फडणवीस यांचे शहरात आगमन होणार आहे.


आरोग्य सर्वेक्षण केल्यानंतर विविध तपासण्या आणि उपचार करण्यासाठी आरोग्य शिबिरात व्यवस्था करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व सुविधांचा आढावा, जिल्हाधिकारी यांनी घेतला. एमआयडीसी, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विद्यार्थी, स्वयंसेवक, होमगार्ड, पोलीस, आरोग्य कर्मचारी याबरोबरच संबंधित विभागाना पाण्डेय यांनी सुचना केल्या. महानगरपालिका, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनांच्या समन्वयातून महाआरोग्य शिबिराची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तर या शिबिरात डॉक्टर, नर्स आणि आशासेविका यांचा समावेश असणार आहे. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा, खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page