top of page

लातूर सोयाबीन संशोधन केंद्र उभारावे; पालकमंत्री अमित देशमुख यांची कृषीसचिव एकनाथ डवले यांना सुचना...


ree

लातूर- लातूर जिल्हयातील सोयाबीन पिकाची पेरणी, उत्पादन, बाजारपेठ आणि त्यावर आधारीत येथे उभारले गेलेले उदयोग लक्षात घेता येथील कृषी महाविदयालय परीसरात सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्याच्यादृष्टीने निर्णय घ्यावा, अशी सुचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लातूर भेटीवर आलेले राज्याच्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना केली आहे. लातूर भेटीवर असलेले कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी शनिवार दि. १२ जून २०२१ रोजी पालकमंत्री अमित देशमुख कार्यालयात येऊन भेट घेतली.

ree

यावेळी लातूर जिल्हयातील कृषी उत्पादन, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, जिल्हयातील हवामान येथे राबवायचे कृषी प्रकल्प, कृषी महाविदयालय, गळीत धान्य संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, पशुधन या संदर्भाने सविस्तर चर्चा झाली. सदयाचे पेरणीचे दिवस लक्षात घेता बियाणे व खताचा पूरवठा सुरळीत व्हावा मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांना थकीत वीमा भरपाई मिळवून दयावी. पात्र लाभधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देणाऱ्या वीमा कंपन्यांना काळया यादीत टाकावे. लातूर जिल्हयात आवश्यकतेनुसार महाबीजचे सोयाबीन बियाणे उपलब्ध करून दयावे. नुकसान भरपाई न देणाऱ्या बियाणे कंपन्यावरही कार्यवाही करावी. लातूर जिल्हयाची कृषी उत्पादकता लक्षात घेता येथे फुडपार्क उभारण्याच्यादृष्टीने प्रस्ताव तयार करावा. जिल्हयात दाळवर्गीय कृषी उत्पादनासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करावी, अशा सुचनाही केल्या आहेत. या भेटी दरम्यान लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., विभागीय कृषी सहसंचालक लातूर जगताप, विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद दिनकर जाधव, जिल्हा कृषी अधिक्षक गवासने, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे डिग्रसे व इतर अधिकारी उपस्थित होते.


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज लातूर

ree

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page