औसा तालुक्यात विविध क्षेत्रातील गुणवंतांचा होणार सन्मान; माजी मंत्री दिलीपराव देशमुख राहणार उपस्तित
- MahaLive News
- Jan 13, 2023
- 1 min read

लातूर- शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र मोरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन संयोजन समितीच्या वतीने औसा येथील केशव बालाजी मंदिर येथे रवीवारी १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार असून या सोहळयात औसा तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सात मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ट्रस्ट चे अध्यक्ष ह. भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर, देवताळा येथील श्रीनाथ मठाचे श्री महंत राजेंद्र गिरी महाराज यांची उपस्थिती राहणार असून याच कार्यक्रमात माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांचे शेतकरी चळवळ यावर व्याख्यान होणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे
शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र मोरे यांनी गेल्या तीन दशकांपासून शेतकरी चळवळीत काम करत सातत्याने शेतकऱ्यासाठी विवीध प्रश्नांवर सरकारकडे मागणी करत मोर्चे आंदोलने यात सहभाग नोंदवला कधी रस्त्यांवर कधी जिल्हाधिकारी कार्यालय तर साखर कारखाना दरबारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे काम केले आहे.
यावेळी त्यांचा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येणार आहे त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक मुकेशजी जाधव, कृषिभूषण धनंजय भोसले, केशव बालाजी मंदिर ट्रस्टचे राजकुमार पल्लोड, सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ बी एन राचमाले, जेष्ठ सर्वोपचार तज्ञ डॉ ए टी अरब , मुक्तेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अँड मुक्तेश्वर वागदरे , प्रख्यात विचारवंत जेष्ठ पत्रकार राजू पाटील यांचा गौरव करण्यात येणार आहे
या अभिष्टचिंतन सोहळ्यास औसा तालुक्यातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या नागरिक, शेतकरी, नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजेंद्र मोरे गौरव संयोजन समिती सदस्य सत्तार पटेल, अरुण दादा कुलकर्णी, प्रा. पी सी पाटील, राजीव कसबे यांनी केले आहे
Comments