top of page

आता पॉलिटेक्निक शिक्षण मराठीतून मिळणार; उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

ree

नाशिक- येत्या 31 डिसेंबरपर्यंत पॉलिटेक्निकच्या शिक्षणासाठी लागणारी सर्व पुस्तकं मराठीतून मिळतील, त्यामुळं पॉलिटेक्निक शिक्षण सहज आणि सोपे होईल, विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होईल अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. इंग्रजीमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी शक्यतो मराठी शिकवावं. ते जर इंग्लिशमध्ये शिकवणार असेल तर इंग्लिशमध्ये शिकवलेलं मराठीत भाषांतर होण्यासाठी डिव्हाईस देणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट सांगितलं. लघुउद्योग भारती नाशिक इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च 2022 स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नाशिकमध्ये पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. दहावीनंतर पॉलिटेक्निक किंवा बारावीनंतर इंजीनियरिंग साठी प्रवेश घ्यायचा म्हटले की ग्रामीण विद्यार्थ्यांपुढे इंग्रजीचं संकट उभे राहतं. अशात पॉलिटेक्निकची पुस्तकं मराठीतून मिळाली तर नक्कीच विद्यार्थ्यांना मदत होईल. आपल्या भाषेतून समजणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं सोपं होईल. त्यामुळं मराठीतून पॉलिटेक्निकच्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. काही नवीन अभ्यासक्रम आता सुरू करण्यात येणार असून या अभ्यासक्रमांमुळे शिक्षणांबरोबर व्यक्तिमत्व विकास देखील झाला पाहिजे. शिक्षणात स्किल डेव्हलपमेंटचे विषय देखील राज्यातील विद्यापीठांनी घ्यावे, अशा सूचना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. देशाच्या आर्थिक परिस्थितीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की "आर्थिक बाबतीत आपण आता पाचव्या क्रमांकावर आलो आहोत. दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्लंडला देखील आता मागे टाकलंय. आता पाचव्या स्थानावरून पहिल्या तीनमध्ये येण्यासाठी संशोधन आणि विज्ञान क्षेत्रात क्रांती झाली पाहिजे, असंही उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page