Search
13 नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सी-60 कमांडोचे पोलीस मुख्यालयात जल्लोषात स्वागत…

#गडचिरोली- जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत संपूर्ण कसनसुर दलमच्या 13 जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांच्या सी-60 दलाला यश आले.

ही शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या जाबाज सी-60 कमांडोचे गडचिरोली पोलिस मुख्यालयात आगमन झाले तेव्हा बँड पथकाच्या गजरात फटाके उडवत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज गडचिरोली






















Comments