Search
मविआ काळातील विकासकामांवरील स्थगिती उठवली...
- MahaLive News
- Aug 11, 2023
- 1 min read

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती दिली. आता मविआच्या कार्यकाळातील विकास कामावरील स्थगिती सरकारने उठवली आहे. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. स्थगिती उठवत कामे सुरु करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु तरीही काही न झाल्याने संभाजी टोपे यांनी पुन्हा याचिका दाखल केली. सुनावणीआधीच सरकारने हा निर्णय घेतला.
Comments