Search
शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये कृषी विभागाचे आवाहन...
- MahaLive News
- Jun 11, 2021
- 1 min read

लातूर- जिल्ह्यातील सर्व कृषि बांधवांना कळविण्यात येते की, जिल्ह्यामध्ये आज अखेर 55.2 मीमी सरासरी पाऊस झालेला असुन अद्यापही पेरणी योग्य पाऊस पडलेला नाही. कृषि विद्यापिठाने किमान 80 ते 100 मीमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये अशी शिफारस केलेली आहे.

८०-१०० मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतक-यांनी किमान आणखी 2 मोठे पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये कारण अपुऱ्या ओलाव्या वर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना केले आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments