top of page

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक...


ree

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील वारजे मधून हा फोन आल्याचं उघड झालं आहे. ११२ हेल्पलाईन क्रमांकावर हा फोन आला होते. "मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे" असे बोलून कॉल कट करण्यात आला. सोमवारी रात्री ११२ वर फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. कॉल करणारा शास्त्री नगर, धारावी इथे राहणारा असल्याची माहितीही समोर आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.


या प्रकरणामध्ये पोलिसांनी राजेश आगवणे या व्यक्तीला अटक केली आहे. त्याने दारूच्या नशेत आधी ॲम्बुलन्सला फोन केला. त्यानंतर ११२ वर फोन केला. पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा व्यक्ती धारावी, मुंबईत वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. त्यांची पत्नी कोथरुडला खाजगी ठिकाणी काम करते. तिला भेटायला महिन्यातून दोन वेळा येतो. तो दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करतो असं त्याच्या पत्नी व ओळखीचे लोक सांगत आहेत.


काल रात्री प्रथम त्याने ११२ वर कॉल करून छातीत दुखतं असुन एम्ब्युलन्स पाठवा असं कळवलं होतं. त्यासाठी नियंत्रण कक्षातून १०८ ला कळवा असे सांगितल्यावर त्याने दुसऱ्यांदा त्याच नंबर वरून माननीय मुख्यमंत्री शिंदेंना धमकी देण्याचा कॉल केला. यानंतर त्याची माहिती घेऊन जेव्हा ताब्यात घेतलं गेलं तेव्हा तो दारुच्या नशेत असल्याचं आढळून आलं आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

सुरक्षित, समृद्ध आणि स्वच्छ निलंगा शहरासाठी - "भव्य विजय संकल्प सभा' | Mahalive Special Report
bottom of page