राज्यात समान नागरी कायदा लागू होणार; देवेन्द्र फडणवीस...
- MahaLive News
- Dec 1, 2022
- 1 min read

मुंबई- महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. देशाच्या राज्यघटनेने ही जबाबदारी राज्यांना दिली असून प्रत्येक राज्याला कधी ना कधी हा निर्णय घ्यावाच लागेल,असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. सध्या गुजरात दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, देशाच्या राज्यघटनेने समान नागरी कायद्याबाबत राज्यांना जबाबदारी व निर्देश दिले आहेत.
गोव्यात समान नागरी कायदा आहे. उत्तराखंड मध्येही ते लागू करत आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात हे राज्यही समान नागरी कायदा लागू करणार आहेत. हळूहळू सर्व राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करतील. शिवाय त्यांना करावाच लागेल असं फडणवीसांनी म्हंटल. दरम्यान, राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम होतोय, याबाबत विचारलं असता कोणीही कोणाचेही प्रकल्प पळवून नेऊ शकत नाही. राज्याचे ज्या गोष्टीत वैशिष्ठय़ असेल, तसे प्रकल्प त्या त्या राज्यात येतात असं उत्तर फडणवीसांनी दिले.
Comments